आचरा गाव स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतचा पुढाकार

आचरा गावात राबवली जाणार स्वछता मोहीम
स्वच्छ आचरा सुंदर आचरा अभियान आचरा ग्रामपंचायत मार्फत दिनांक 1मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अभियानाची सुरुवात शुक्रवारी सकाळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आचरा टेंबली ते आचरा तिठा मार्ग या भागात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात व इतर जागेतील कचरा गोळा करण्यात आला.
या मोहिमेत सरपंच जेरोन फर्नाडीस यांच्या सह उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंदू कदम, पुर्वा तारी, उद्योजक अभय भोसले, गुरु कांबळी, यश मिराशी, पोलीस पाटिल तन्वी जोशी, जगनाथ जोशी, मिताली कोरगावकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब गिरीश आपकर रुपेश परब सिध्देश वराडकर तुषार परब आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. मोहिमेची माहिती देताना सरपंच जेरोन फर्नांडीस म्हणाले की गावातील सर्व ग्रामस्थामार्फत कचरा श्रमदानातून गोळा केला जाणार आहे प्रत्येक ग्रामस्थांनी एक दिवस स्वच्छतेसाठी या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी स्वच्छते साठी श्रमदान करायचे आहे तसेच प्रत्येक ग्रामस्थाने आपला घरामध्ये तयार होणारा ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यामध्ये भरून कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ ठेवू या जिल्हा परिषदेच्या मोहिमेत सहभाग घेऊन आचरा गाव स्वच्छ ठेवायचे आहे व अभियान यशस्वी करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच फर्नांडीस यांनी केले.