स्वसंरक्षण व तायक्वांडो (कोरियन कराटे) प्रशिक्षण उपक्रम

तायक्वांडो हा शालेय क्रीडा प्रकार व कोरियन कराटे शैली. स्वसंरक्षण ही आज काळाची गरज बनली आहे. याच हेतूने तोंडवली शाळा नंबर एक येथे गावातील तीनही प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना या खेळाची ओळख व्हावी या उद्देशाने प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.यावेळी श्री जाधव सर, श्री पाटील सर,श्री पेडणेकर सर, श्रीमती सावंत मॅडम तसेच आंगणवाडी व पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते. तायक्वांडो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक श्री. भालचंद्र कुळकर्णी, राष्ट्रीय प्रशिक्षक श्री अविराज खांडेकर , खेळाडू कु. संध्या गोधळकर, कु. दुर्वा पवार, कु. दिपश्री तेंडुलकर कु. दिव्येश तेंडुलकर यांचे स्वागत श्री जाधव सर यानी केले. सहभागी मुलांना श्री.भालचंद्र कुळकर्णी यांनी तायक्वांडो या खेळाची प्राथमिक माहिती व या खेळाचे स्वसंरक्षणात्मक डावपेच याबाबत माहिती दिली. तसेच श्री अविराज खांडेकर यांनी प्रत्यक्ष सराव करून घेतला. तत्पूर्वी सर्वांना खेळामधील फिटनेसचे महत्व प्रात्यक्षिक सराव करून घेण्यात आला.तीनही शाळांच्या सहभागी मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संघटनेतर्फे सर्व मुले व भेट दिलेल्या पालकांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या शैलीत श्री पाटील सर यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तीनही शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक श्री चव्हाण श्रीमती. पडवळे श्रीमती. पवार श्रीमती. सावंत यांनी सहकार्य केले. शालेय मुलांना व शिक्षकांना नेहमीच सहकार्य राहील असे श्री भालचंद्र कुळकर्णी यांनी सांगितले व सहकार्याबद्दल सर्व पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सहभागी सर्व खेळाडू यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!