आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मंदार शिरसाट, राजन नाईक, अमरसेन सावंत,
कृष्णा धुरी, रुपेश पावसकर, बबन बोभाटे, अतुल बंगे, स्वप्निल शिंदे, बाबी गुरव, संतोष शिरसाट, बंड्या कोरगावकर, श्रेया गवंडे, मंगेश बांदेकर, बाळ धुरी, मितेश वालावलकर, गुरुनाथ गडकर, संदीप म्हाडेश्वर, धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण, ज्योती जळवी, अनघा तेंडुलकर, मिहिर तेंडोलकर आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरास सिंधुदुर्ग जिलह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ


