एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या प्रथमेश जोशी याचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत मिळवलेले यश उल्लेखनीय
कसाल वजरीवाडी येथील कु. प्रथमेश उमेश जोशी याने एमपीएससी परीक्षेत उर्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे. आई वडील हयात नसताना नशिबी आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत, जिद्द आणि चिकाटीने कठोर परिश्रम करून त्याने हे यश मिळविल्याने गुरुवारी कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कु. प्रथमेश जोशी याला पुष्पहार घालून व शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शिवसेना सामाजिक कार्यकर्ते अवधूत मालणकर, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, बाळा कांदळकर, गणेश मेस्त्री,कुसबे उपसरपंच राजू घाडीगावकर, कुलवंत वारंग, प्रकाश कसालकर, स्वप्निल मोडक, ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर, माजी सरपंच नीलिमा वाडकर, सत्यवान म्हसकर, गणेश पारकर, रामचंद्र जगताप आदींसह शिवसैनिक, ग्रामस्थ व प्रथमेशची आजी उपस्थित होती.