जम्मू काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचा झेंडा जाळुन कणकवलीत निषेध

पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत केला संताप व्यक्त

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध भारतीयांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज कणकवलीत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देखील देण्यात आल्या. याप्रसंगी बजरंगदल रत्नागिरी सिंधुदुर्ग विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर,तालुका संयोजक
नागेश मोगवीरा, सहसंयोजक दिनेश सरुडकर, अखिल आजगावकर, मकरंद सावंत,विश्व हिंदू परिषद
तालुका प्रमुख सुनील सावंत, नंदकुमार आरोलकर,राष्ट्र सेविका समिती प्रतिभा करंबेळकर, मृणाल ठाकूर, सुरेखा महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे निलेश तळेकर, भारतीय मजदूर संघ भगवान साटम, शेखर गडेकर, नरोत्तमभाई पटेल, पंडित करंबेळकर, नायगावकर, अमित मयेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!