पोंभुर्ले येथील वारस तपास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देवगड तहसीलदार आर जे पवार यांची प्रमुख उपस्थिती

देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथ महसूल आणिपोंभुर्ले ग्रामपंचायत च्या सहकार्याने आयोजित वारस तपास शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.देवगड तहसीलदार आर जे पवार यांनी शिबिराला भेट देत उत्कृष्ट आयोजना बाबत आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध योजनाची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले

शासनाच्या जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत
पोंभुर्ले गावासाठी गुरुवारी वारस तपास कॅम्प घेण्यात आला. या शिबिराचा शुभारंभ देवगड तहसीलदार आर जे पवार यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाला.. यावेळी त्यांच्या सोबत
पाटगाव मंडळ अधिकारी जनार्दन
साईल,पोंभुर्ले सरपंच – प्रियांका धावडे
उपसरपंच – सादिक डोंगरकर
तलाठी – सुनीता मेस्त्री, प्रथमेश आसोलकर, रमाकांत डगरे
कोतवाल – प्रकाश घाडी, हर्षला राणे, प्रणित सावंत,देवगड
तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रमोद आचरेकर,पोंभुर्ले
माजी तंटामुक्ती अध्यक्ष – अशोक पाडावे
पोलिस पाटील – श्रीम. आर आर मोंडे, विलास सुतार
याशिवाय ग्रामपंचायत कर्मचारी – शैलेश फाळके, सुशांत घाडी व पोंभुर्ले व मालपेवाडी गावातील खातेदार ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

पोंभुर्ले मालपे भाग हा देवगड तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून दुरचा भाग असल्याने शासकीय कामासाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रतिज्ञापत्र करणे अतिशय त्रासाचे ठरते .यासाठी देवगड तहसीलदार आर जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटगांव मंडळ अधिकारी जनार्दन साईल व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सुनीता मेस्त्री यांनी अभिनव संकल्पना राबवित वारस तपास करणे सोईस्कर होण्यासाठी प्रतिज्ञापत्र, सरपंच, पोलीस पाटील दाखले व अर्ज हे एकाच ठिकाणी होऊन जीवंत सातबारा ही मोहीम लवकरात लवकर करण्यासाठी पोंभुर्ले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या सहकार्याने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.याला गावांतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

देवगड तालुक्यापासून दूर अश्या या गावांमध्ये ग्रामस्थांच्या सोयीसाठी घेतलेला हा कॅम्प हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे मत उपसरपंच सादिक डोंगरकर यांनी व्यक्त केले.
सदर कॅम्पमध्ये 42 वारस तपास अर्ज दाखल करण्यात आले. याशिवाय 6 उत्पन्न दाखले व 6 खातेदारांच्या 7/12 ला आधार लिंक करण्यात आली

error: Content is protected !!