आचरा टेंबली येथील ट्रान्सफॉर्मर व स्ट्रीट लाईट कार्यान्वित

ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले समाधान
आचरा टेंबली भागासाठी वेगळा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा अशी काही वर्षापासूनची असलेली मागणी आज पूर्णत्वास जाऊन या भागासाठी आवश्यक असलेला ट्रान्सफॉर्मर विद्युत वितरण कडून बसवण्यात आला असून आचरा गावचे सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत माजी सरपंच अनिल करंजे यांच्या हस्ते
कार्यान्वित करण्यात आला यावेळी या भागातील स्ट्रीट लाईही चालू करण्यात आली.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे, रुपेश पाटकर, सदस्य महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंद्रकांत कदम, अभय भोसले,जयप्रकाश परूळेकर, मंदार सांबारी,अभिजित सावंत, जितेंद्र राणे,भरत किरुळकर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आचरा टेंबली भागात नव्याने लोकवस्ती वाढली होती. होणारा विजेचा पुरवठा हा कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवरून होत होता. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असे. याठिकाणी आणखी ट्रान्सफॉर्मर बसावण्यात यावा अशी मागणी शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे यांनी सातत्याने केली होती. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे जिल्हा नियोजन मधून हा नविन ट्रान्सफॉर्मर मिळाला आहे. गेली कित्येक वर्षे असलेली मागणी पूर्ण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.