आंब्रड-परबवाडीमध्ये आढळला ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह

कुडाळ : आंब्रड-परबवाडी येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत ५६ वर्षीय ज्ञानेश्वर पांडुरंग राणे यांचा मृतदेह सापडला. याबाबत विठ्ठल राणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
आंब्रड परबवाडी येथील ज्ञानेश्वर पांडुरंग राणे हे मागील काही दिवस मनोरुग्ण होते. त्यांच्यावर मुंबई, रत्नागिरी येथील मनोरुग्ण रुग्णालयातील उपचार सुरू होते. दरम्यान, आंब्रड येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह प्रकाश परब यांना दिसला. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात विठ्ठल राणे यांनी खबर दिली आहे. याचा तपास आवळेगाव दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार मंगेश जाधव करीत आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ





