कलमठ-सुतारवाडी येथे १९ रोजी विविध कार्यक्रम

कलमठ-सुतारवाडी येथील पिंपळपार मित्रमंडळाच्यावतीने शनिवार १९ एप्रिल रोजी पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. फनीगेम्स, ६ वा. भजनांचा कार्यक्रम, ७ वा. स्थानिक कलाकारांचे रेकॉर्ड डान्स, रात्री ९ वा. चिमणी पाखर कुडाळ यांचा नृत्याविष्कार व सुंदरी डान्स शो फेम दीक्षा नाईक हिचा खास नृत्याविष्कार होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपळपार मित्रमंडळाने केले आहे.

error: Content is protected !!