युवासेनेकडून शिक्षणमंत्री केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएडधारकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या, या मागणीसाठी आज दुपारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर युवासेनेकडून आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी डीएडधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, योगेश धुरी, अमित राणे, राजू गवंडे, पंकज गावडे, विजय पावसकर, मनीष तोटकेकर, रुपेश पवार, मिहिर तेंडोलकर, संदीप महाडेश्वर, संदेश सावंत, गुरुनाथ गडकर, सागर जाधव आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, सावंतवाडी