शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणी बैठक रविवारी

पक्षाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवार 5 जानेवारी 2025 रोजी मातोश्री हॉल येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, बाळा भिसे, शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हा संघटक निलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
तरी या बैठकीस कणकवली तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख कन्हैय्या पारकर आणि प्रथमेश सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!