फोंडाघाट येथील पूर्णानंद भवनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन

ज्ञाती बांधवांनी सहभाग घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन
कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज , कणकवली यांनी श्रीमत पूर्णानंद भवनाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने ( कणकवली तालुका ज्ञाती बांधव मर्यादित) निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा २ गटात राहील.
१. शालेय गट ( वय वर्ष २१ पर्यंत)
विषय –
१) १० / १२ साठी खाजगी शिकवणी आवश्यकच आहे का ?
२) व्यक्तिमत्व विकासात पालकांची भूमिका काय असावी.
३) शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ कसे आवश्यक ठरतात.
४) प्लास्टिक मुक्त जग , माझे विचार आणि उपाय. खुला गट – वय वर्ष २१ पुढील
१ ) समाज माध्यमे ज्ञान आणि माहिती साठी कितपत उपयोगी
२) संस्कृती संवर्धनात धर्म आणि जात यांची भूमिका
३) जुन्या धार्मिक आणि सामाजिक परंपरा निरामय जीवनासाठी कशा पूरक होत्या.
४) कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान.
टीप –
१) शालेय गट मर्यादा ३०० शब्द
२ ) खुला गट ५०० शब्द.
३) निबंध बंद लिफाफा व त्यावर नाव पत्ता , मोबाईल नंबर असावा.
४) सदरील निबंध स्पर्धा ही कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज यांचा साठीच मर्यादित राहील.
५) स्पर्धकांनी आपले निबंध १६ जानेवारी २०२५ सायंकाळी ७ वाजेपर्यंत खाली दिलेल्या व्यक्ती कडे द्यावे.
अधिक माहिती करिता संपर्क-
राजू आजगावकर – ९४२१२६६४६४
प्रथमेश महाजन – ७४९९६०६२९३
मंदार अवसरे – ९३२६६०३१९७
प्रथमेश सामंत – ८३४८७२७२७२
सुयोग टिकले – ९४२०२०६५३८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.