मदतीसाठीची काव्याची बातमी वाचली आणि कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार!

गौरव गवाणकर व मित्रमंडळी कडून चंद्रशेखर शेळके यांच्या तीन वर्षीय मुलीला मदत

अजूनही दात्यानी पुढे येऊन मदत करण्याचे कोकण नाऊं चे आवाहन

मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या अवघ्या तीन वर्षाची चिमुरडी काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर या आजाराचे निदान झाले. काव्याची अचानक प्रकृती खालवल्याने स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. उपचारला साथ मिळत नसल्याने तिला बांबूळी गोवा येथे हलवण्यात आले तपासणी दरम्यान तिला ब्लड कॅन्सर झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी बातमी समाज माध्यमांमधून कानी पडताच कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर व त्यांची मित्रमंडळी यांनी एकवटत या काव्याला आर्थिक व साहित्य स्वरूपात मदत केली. त्यामुळे कोकण नाउं च्या आचरा प्रतिनिधींनी केलेल्या बातमीने अखेर जिल्ह्याभरातून मदतीचा ओघ सुरू होऊ लागला आहे. त्या शेळके कुटुंबियांना अजून देखील मदतीची अपेक्षा असून दात्यानी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन गौरव गवांणकर यांनी जनतेला केले आहे. गौरव गवाणकर यांच्या मित्रमंडळीच्या वतीने शेळके कुटुंबीयांना मदत प्रदान करताना गौरव गवाणकर, मिंगेल मंतेरो, महेश नार्वेकर, आनंद पारकर, जय शेट्ये,रवी बाणे, संजय पारकर, भालचंद्र नार्वेकर, यांनी 35000 रू रोख व तांदूळ डाळ तेल अन्य जीवनावश्यक वस्तू त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केल्या.
काव्य हिच्या बाबतीतील बातमी फेसबुक, व्हाट्स अप ग्रुप, आपले मित्रमंडळी, नातेवाईक, दानशूर संघटना यांच्या माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत करून कु. काव्या शेळके या मुलीला उपचार देऊन आजारातून लवकरात लवकर बरी होण्यासाठी माणुसकीच्या नात्याने आपल्याला जमेल तसा हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले होते. यानंतरही कुणाला काव्य हिला मदत करायची असल्यास बँक तपशील
नाव :- चंद्रशेखर बाबुराव शेळके
बँकेचे नाव :-बँक ऑफ इंडिया
शाखा :-आचरा
आय एफ एस सी कोड :- BKID0001472
खाते क्रमांक :- 147210110005241
गुगल पे क्रमांक
चंद्रशेखर शेळके – 9420822659 या क्रमांक वर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!