आयडियल स्पेशल स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा.
कणकवली/मयूर ठाकूर
नव दिव्यांग फाऊंडेशन च्या आयडियल स्पेशल स्कूल वरवडे मध्ये जागतिक दिव्यांग दिन नुकताच साजरा करण्यात आला.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,आयडियल इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,यांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सूरवात करण्यात आली.
सर्वांचे स्वागत करण्यात आले.दिव्यांगावर मात करत अनेक अडथळ्यांचा सामना करणाऱ्यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या हेलन केलर यांच्या बद्दल माहिती सांगत दिव्यांग दिनाविषयीचे विशेष मार्गदर्शन दिव्यांग स्कूल चे शिक्षक श्री.पुरुषोत्तम पाताडे सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तसेच दिव्यांग स्कूल चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.