घोडावत विद्यापीठात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम
जयसिंगपूर : सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार, एम. एस.एम.ई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद आणि संजय घोडावत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.14 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत घोडावत विद्यापीठात सुरू होणार असल्याची माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता सेल चे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी दिली आहे.
या कार्यशाळेस सुशिक्षित बेरोजगार, आर्ट्स,कॉमर्स, सायन्स महाविद्यालयीन विद्यार्थी, एमबीए, बीबीए, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री व नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व युवक-युवती सहभाग घेऊ शकतात.
ही कार्यशाळा एस.सी आणि एस.टी संवर्गातील युवक युवतींसाठी मोफत असून इतर सर्वांना नाममात्र फी आहे. या मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना एम. एस.एम.ई चे प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्राचा उपयोग उद्योग, आधार नोंदणीसाठी तसेच केंद्र आणि राज्य शासकीय योजनेतील कर्ज प्रकरणासाठी उपयुक्त असेल. या कार्यशाळेत एम.एस.एम.ई चे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन व्यवस्थापन विभागाच्या डीन डॉ. योगेश्वरी गिरी यांनी केले आहे.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.सत्यजित इंगवले, प्रा. सोनल बुधवानी, विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.या कार्यशाळेस अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.