खारेपाटण बाजारपेठ येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याचा डोर टू डोर प्रचार …

भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,व आर पी आय महायुतीचे कणकवली,देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रविवारी दि.१० रोजी सकाळी १०.३० वाजता खारेपाटण बाजारपेठ भाजप पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. तर महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी डोर टू डोर प्रचार करत खारेपाटण मध्ये प्रचारात गती घेतली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,माजी पं.स.सदस्य सौ तृप्ती माळवदे,दादा कर्ले,विजय देसाई,प्रवीण लोकरे, नंदकिशोर कोरगावकर,भाऊ राणे,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल सूर्यकांत भालेकर,सुरेंद्र कोरगावकर,अनिल काका देवस्थळी,खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच किशोर माळवदे, विनायक शिंदे,भाजप ओ बी सी महिला आघाडी कणकवली तालुका उपाध्यक्ष सौ उज्ज्वला चीके,महिला कार्यकारणी सदस्य सौ आरती गाठे,
खारेपाटण ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे,सौ मानली होणाळे,दक्षता सुतार,शीतिजा धुमाळे,सोनल लोकरे,साधना धुमाळे,पप्पू रायबागकर,योगेश गोडवे,विजय सावंत,गणेश कारेकर,शेखर शिंदे आदी मान्यवर पदाधीकारी यावेळी उपस्थित होते.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ खारेपाटण बाजारपेठेत काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत भाजप कार्यकर्ते जयवंत देवस्थळी,बाळ्या रोडी,शेखर कांबळे,रामा पांचाळ,राजेंद्र भालेकर महेश राऊत,गौरव ढेकणे,बबन तेली अमोल गुरव,सुयोग ब्रम्हदंडे,निलेश गुरव,गणेश लवेकर,राज गुरव,अभय ठाकूरदेसाई आदीचा सहभाग होता.
खारेपाटण एस टी बसस्थानक ते खारेपाटण बाजारपेठ ते थेट घोडेपाथर बंदर खारेपाटण अशी भाजप पक्षाच्या वतीने प्रचार फेरी काढण्यात आली.यामध्ये अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.




