कळसुळीतील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात

सुषमा अंधारे यांच्या हस्ते केला होता ठाकरे गटामध्ये प्रवेश

गावचा विकास आणि प्रगती यांच्यासाठी आमदार नितेश राणे यांना साथ देणार : विठ्ठल चव्हाण

कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील ठाकरे सेना युवा कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
यामुळे उ.बा.ठा. सेनाला कळसुली गावामध्ये धक्का बसला आहे. उ.बा.ठा. सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत विठ्ठल चव्हाण यांनी उ.बा.ठा. सेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र केवळ आश्वासने देणे व फसवणे या पलीकडे काहीही घडत नाही. हे लक्षात आल्याने विठ्ठल चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

कार्यकर्त्याला आपल्या कुटुंबातील माणसाप्रमाणे जपणे, गावाच्या विकासाकडे लक्ष देणे, वीज, रस्ते, पाणी या भौतिक सुविधा निर्माण करणे ही कामे आमदार नितेश राणे प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्याबरोबर राहणे म्हणजे आपल्या भागाचा विकास, म्हणून आपण आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केल्याचे विठ्ठल चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी भाजपा पदाधिकारी संदीप मेस्त्री, सरपंच सचिन पारधीये, नामदेव जाधव, मारुती चव्हाण, जॉनी फर्नांडिस, रुजाय फर्नांडिस, डेव्हिड फर्नांडिस उपस्थित होते.

error: Content is protected !!