वारकरी समाजाच्या मागण्या महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरच पूर्ण करू शकतील

वैभववाडी येथे पंढरपूरला रवाना होणाऱ्या पालखीचे घेतले दर्शन
या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे प्रकाश सुतार यांचे प्रतिपादन
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी कोकीसर येथे प्रकाश सुतार यांच्या घरी असणारी पंढरपूर येथे रवाना होणाऱ्या पालखीला सदिच्छा भेट दिली. यावेळी वैभववाडी तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचा वारकरी समाज शंभर टक्के संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आणि संदेश पारकर यांनाच कणकवली विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आणणार असा निर्धार वारकरी वारकरी संप्रदायाचे प्रकाश सुतार यांनी केला. वारकरी संप्रदायाच्या मागण्या संदेश पारकर या हेच पूर्ण करू शकतात त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील शंभर टक्के मतदान वारकरी संप्रदाय संदेश पारकर यांनाच करणार असा निश्चय यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आला. यावेळी संदेश पारकर यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पीळणकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेश लोके, संजय हिर्लेकर, प्रकाश सुतार, गणेश गिरकर, राजेंद्र पारकर, अनिल पाळेकर, नाईक धुरी, संजय गुरव, राजू पडवळ आणि मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय चे ग्रामस्थ महिला उपस्थित होते.





