कोल्हापूर ते गोवा विनापरवाना सिगरेट वाहतुकीचा पर्दाफाश
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
तब्बल 6 लाखाच्या ब्रँडेड कंपनीच्या सिगरेट जप्त
आचारसंहिता कालावधीत फोंडाघाट चेकपोस्टवर दुसरी कारवाई
कोल्हापूरहून गोव्याला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून विनापरवाना सिगरेट वाहतूक चा पर्दाफाश फोंडाघाट चेक पोस्टवरील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून करण्यात आला. आज गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर फोंडाघाट चेकपोस्टवरील ही सलग दुसरी कारवाई असून या कारवाईमुळे फोंडाघाट चेक पोस्टवरील अनधिकृत वाहतुकीचा पोलखोल झाला आहे. याबाबत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रवासी वाहतूक करणारी ही टेम्पो ट्रॅव्हलर्स स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी करण्यात आली. असताना या टेम्पो ट्रॅव्हलर्स मध्ये प्रवाशांसह एका कंपनीच्या सिगरेट असल्याचे आढळून आले. उपलब्ध माहितीनुसार तब्बल 6 लाख रुपये किमतीच्या या सिगरेट असल्याचे समजते. दरम्यान अशा प्रकारे तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करताना त्याला परवान्याची गरज असते. मात्र कोल्हापूर ते गोवा अशी वाहतूक करत असलेली ही टेम्पो ट्रॅव्हलर चालक हा परवाना न बाळगता वाहतूक करत होता. त्यामुळे स्थिर सर्वेक्षण पथकातील पोलिसांनी तपासणी केली असता या अवैध सिगरेट वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला. याबाबतची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान यापूर्वी फोंडाघाट चेक पोस्टवर रोकड जप्त करत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही आचारसंहिता कालावधीतील दुसरी कारवाई आहे. त्यामुळे या पथकातील पोलिसांचे कौतुक केले जात आहे. फोंडाघाट चेक पोस्टवर कार्यरत असणारे उद्देश कदम, प्रशांत पाटील, नितीन बनसोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.