महामार्गावर बिबवणे – तेर्से बांबर्डे दरम्यान भीषण अपघात

तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर
कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील बिबवणे – तेर्से बांबर्डे दरम्यान आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन कार मध्ये अपघात घडला. या अपघातात तिघे जखमी झाले असून यातील एकाची स्थिती गंभीर असल्याचे समजते. हुमरस येथील शिवसेना पदाधिकारी नॅनो कारने कुडाळकडे येत असताना मागून आलेल्या क्रेटा कारने नॅनोला जोरदार धडक दिली. यामध्ये नॅनो कार तीन ते चार पलटी मारून महामार्गाच्या बाजूला जावून धडकली. या अपघातातील तिन्ही जखमींना पणजी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
नाथा शांताराम परब, गोपाळ उर्फ उमेश सावंत, सोनू चंद्रकांत लिंगवत अशी जखमींची नावे आहेत.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ