घोटगेचे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत

कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक श्री. बाबू सावंत, श्री. अमोल सावंत यांच्या सहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
घोडगे ग्रामपंचायतीवर गेली २ वर्ष भाजपची सत्ता असून त्याठिकाणच्या भाजप सरपंच विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहेत. मागील दोन वर्षात एकही विकास काम त्यांच्या माध्यमातून झालेले नाही. परंतु आमदार वैभव नाईक यांनी घोटगे ग्रामस्थांना कधीही नाराज केले नाही रस्ते, विहिरी, त्याचप्रमाणे पायवाट यासारखी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.हे सर्व गोष्टी लक्षात घेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत असल्याचे प्रवेश कर्त्यानी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुका प्रमुख सचिन कदम, उपतालुका प्रमुख यशपाल सावंत, आबा मुंज, विभागप्रमुख विकास राऊळ, घोडगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, हर्षद दवळ, जांभवडे युवा प्रमुख अविनाश गोवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!