अखेर “ते” वादग्रस्त बॅनर पोलीस प्रशासनाने हटवले

कणकवली शहरासह तालुक्यात अनेक भागांमध्ये लागले होते बॅनर
पोलीस प्रशासनाकडून तात्काळ खबरदारीच्या उपायोजना
कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासारडे आदी भागांमध्ये अज्ञातांकडून लावण्यात आलेले “श्रीधर नाईक अमर रहे, सत्यविजय भीसे अमर रहे, सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा” “आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस” अशा आशयाचे लागलेले बॅनर अखेर पोलीस प्रशासनाने तात्काळ हटवले आहेत. कणकवली शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये हे बॅनर लावले होते. मात्र निवडणूक आचारसहिता व निवडणूक काळात कोणतेही तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपायोजना म्हणून पोलिसांनी तात्काळ हे बॅनर हटवले त्यामुळे हे बॅनर कोणी लावले त्याची मात्र चर्चा अद्याप सुरू आहे.





