अखेर माजी आमदार परशुराम उपरकर शिवसेना ठाकरे गटात दाखल

अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे सोबत उपरकरांचे मनोमिलन

सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटा मध्ये प्रवेश केला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उपरकर यांची ओळख होती. मात्र मध्यंतरी मनसेमध्ये गेल्याने उपरकर व ठाकरे मध्ये दुरावा निर्माण झाला होता. उपरकर काही महिन्यांपूर्वी प्रवेश करणाऱ अशी चर्चा होती. मात्र त्यासाठी मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार विनायक राऊत, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, प्रणव उपरकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!