माजी आमदार परशुराम उपरकर यांचा शिवसेनेत ठाकरे गटात प्रवेश होणार

आज दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधणार शिवबंधन
उपरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये उत्साह
एकेकाळचे राणेंचे डावे उजवे असलेले दोन्ही माजी आमदार पुन्हा स्वगृही
एकेकाळी राणे नारायण राणेंचे डावे उजवे समजले जाणारे व दोन्हीही माजी आमदार असलेले राणेंचे एकेकाळीचे खंदे कार्यकर्ते राजन तेली हे शिवसेना ठाकरे गटात गेल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ माजी आमदार परशुराम उपरकर हे देखील शिवसेना ठाकरे गटात आज दुपारी 12.30 वाजता प्रवेश करत आहेत. त्यामुळे राणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात जुन्यांची पुन्हा एकदा फौज उभारण्याचे काम ठाकरे गटाकडून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी आमदार परशुराम उपरकर हे शिवसेनेतून विधान परिषद वर माजी आमदार म्हणून राहिले होते. शिवसेनेच्या अनेक पदांवर त्यांनी काम केलेले असताना माजी आमदार म्हणून टर्म संपल्यानंतर पुन्हा आमदारकीसाठी ते इच्छुक होते. मात्र ते न दिल्याने त्यांनी मनसेची वाट धरली होती. ठाकरे घराण्याशी उपरकर यांचे जुने संबंध आहेत. मात्र दरम्यानच्या काळात हे संबंध दुरावले गेले होते. मात्र आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार परशुराम उपरकर यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश हा निश्चितच विरोधी पक्षाला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची अद्याप निश्चिती झालेली नसली तरी आज या उमेदवाराच्या वर शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता आहे. गेले काही दिवस उपरकर यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश रखडला होता मात्र हा रखडलेला प्रवेश आज मार्गी लागत असल्याचे येत्या काळात उपरकर भाजपा विरोधात विधानसभा निवडणुकीत जोरदार रणशिंग फुंकणार हे निश्चित आहे.