नडगीवे घाटात दोन कार मध्ये अपघात

अपघातात दोन्ही कार मधील प्रवाशी जखमी
आज 2ऑक्टोबर, बुधवार सकाळी 8च्या सुमारास नडगीवे घाटात दोन कार चा अपघात झाला.यामध्ये मुंबईहुन गोव्याकडे जात असणारी कार डिवायडर वरून चढून रस्त्याच्या दुसऱ्या लेन वर आली. व त्या रोड वरून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या कार ला धडकुन अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शनी सांगण्यात येत आहे .दोन्ही कार मधील 6 प्रवासी हे जखमी झाले आहेत.अपघातातील जखमीना 108 रुग्णवाहिकेने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दूरक्षेत्रचे पो/कॉ पराग मोहिते, पोलीस शिवाजी पाटील हे घटनास्थळी त्वरित दाखल होऊन अपघाताची पाहणी करून, महामार्गवरील इतर वाहनाना प्रवासासाठी योग्य पद्धतीने मार्ग मोकळा करून दिला.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





