राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैभववाडी येथे गांधी जयंती साजरी

स्वच्छता मोहीम राबवत केले परिसराचे सुशोभीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली,तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोरे येथे स्वच्छता मोहीम तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले याचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका सचिव गणेश पवार, ओबीसी तालुकाध्यक्ष वैभववाडी शशिकांत मुद्रस ,बाळा माळकर, किशोर राणे ,ज्ञानेश्वर पवार तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वैभववाडी प्रतिनिधी





