ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात तब्बल 443 कोंबड्याचा बुडून मृत्यू

सांगवे आंबेडकरनगर येथील घटना
पोल्ट्री फार्म मालक सुनील कांबळे यांचे मोठे नुकसान
कनेडी – भिरवंडे परिसरात नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने दाणादाण उडवलेली असतानाच सांगवे आंबेडकर नगर येथील सुनील कांबळे यांच्या पोल्ट्री फार्म मधील तब्बल 443 कोंबड्या ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्या. यामुळे सुनील कांबळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या कोंबड्या पोल्ट्री फार्म मधून काही प्रमाणात वाहून गेल्याने अक्षरशा मन हेलावून टाकणारी दृश्य या ठिकाणी दिसत होती. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घटनास्थळी भेट घेत पाहणी केली. गांधीनगर, सांगवे परिसरात दोन दिवसापूर्वी मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यात अनेक लोकांचे भात शेतीसह इमारतींचेही नुकसान झाले. सुनील कांबळे यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना देण्याची मागणी केली जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली