भिरवंडे गांधीनगर मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हलकल्लोळ

भागातील शेतकरी, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

घरांमध्ये देखील घुसले पावसाचे पाणी

शिवसेना ठाकरेगट तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत व पदाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी

भीरवंडे – गांधीनगर येथे काल सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या सहीत पदाधिकारी यांनी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या बाबत महसूल विभागाला पंचनामे करण्या बाबत कळविण्यात आले. यावेळी उपजिल्हप्रमुख बेनी डिसोजा , युवासेना उपजिल्हप्रमुख मुकेश सावंत उपस्थित होते.
काल दुपारी भिरवंडे गांधीनगर येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे गावातील संपूर्ण भातशेती जमीनदोस्त झाली. तसेच वरचीवाडी येथील पायवाट वाहून गेली. ४ विहिरी पाण्याखाली गेल्यामुळे त्या ढासळल्या आहेत. लोकांची चिरेबंदी गाडगे वाहून गेले. काजू कलमे, नारळाची रोप वाहून गेले., लोकांच्या घरात पाणी घुसून घरातील भांडी वाहून गेली असे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
या घटनेची माहिती तात्काळ तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी विधानसभा प्रमुख सतीश सावंत याना माहिती दिली. व त्यानी तात्काळ तहसीलदार दिक्षांत देशपांडे याना माहिती दिली व तेथे जावून वस्तुस्थिती पाहून त्वरित पंचनामे करून लोकाना तत्काळ मदत करावी अशी विनंती केली.
यावेळी घटनेची पाहणी करताना सरपंच बोभाटे , उपसरपंच बाळा सावंत, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागाचे कृषितज्ज्ञ, आरोग्य विभागाचे डॉक्टर, तसेच शाखाप्रमुख प्रकाश सावंत, प्रथमेश सावंत, बंटी सावंत, तेजस सावंत, शुभम सावंत, अभी मेस्त्री आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!