जाणवली ते कणकवली शहर जोडणारा पूल अनंत चतुर्थी दिवशी ठरला आकर्षण.

पुलावरून गणपती देखावे आणि विसर्जनाची मनमोहक दृश्ये पाहता येत असल्याने भाविक भक्तांमधून समाधान.

गणपती साना पुलावर गणेश भक्तांची मोठी गर्दी.

कणकवली/मयूर ठाकूर

जानवली ते कणकवली शहर जोडणारा गणपती साना पूल अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने आकर्षण ठरला आहे.येणारे सर्व भविक पुलावर येऊन गर्दी करताना दिसतायत.
महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च २०२४ ला या पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी केले होते.
अवघ्या सव्वा दोन महिन्यात या पुलाचे काम ठेकेदार अनिस नाईक यांनी पूर्ण केले.
राज्य सरकारच्या नाबार्ड योजनेतून पुलासाठी निधी मंजूर करण्यात आला होता.
अतिशय देखण्या स्वरूपात हा पूल आज लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

error: Content is protected !!