अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाद्वारे मैत्री करून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दिलीप दशरथ पवार कणकवली याची सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 तथा विशेष न्यायाधीश श्रीमती एस एस जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
दिनांक 23/ 9/ 2023 रोजी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी त्यांचे शेजारी गणपती निमित्त असलेल्या जेवणासाठी गेली असताना आरोपी याने तिला फुस लावून कणकवली येथून बसने सावंतवाडी, मुंबई, पुणे, कोल्हापूर असे फिरवून दिनांक 28/9/2023 रोजी विजापूर येथे नेऊन तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भा. द. वी. कलम ३६३ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4,6,8,12 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(१)(w)(i)(ii), 3(२)(v),3(२)(va) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ऑक्टोबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती.
सुनावणी दरम्याने सरकारी पक्षाकडून ४ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती तसेच कोणताही विश्वासार्ह्य पुरावा पुढे न आल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
कणकवली प्रतिनिधी