आरे येथील बीएसएनएल टॉवर च्या नेटवर्क समस्येची युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख मिलींद साटम यांनी केली पाहणी

माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झाले होते टॉवरचे काम

खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आरे येथील बीएसएनएल टॉवर मंजूर झाला होता व त्याचे काम पूर्ण झाले होते. आता गावातील लाईट गेल्यावर नागरिकांना नेटवर्क पासून वंचित रहावे लागत आहे ही मोठी समस्या गावात होत आहे.आता टॉवर साठी सोलर पॅनल बसवून बॅटरी बॅकअप देण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. येत्या ४ ते ५ दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी बीएसएनएल टॉवर च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला व काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात बाबत सूचना दिल्या. आता आरे गावातील नागरिकांना लाईट गेल्यावर नेटवर्क ची समस्या लवकरच दूर होणार आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, माजी उपतालुकाप्रमुख उमेश कदम, शाखाप्रमुख मालंडकर आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!