मालवणात कडकडीत बंद, छत्रपतींचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मालवणात आज निषेध मोर्चा

सिंधुदुर्ग-
मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मालवणात प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने जनसंताप मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. या मोर्चात आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे सहभागी होणार आहेत