भंगार अड्डयाला आग, लाखोचे नुकसान

🛑भांडणाच्या रागातून आग लावल्याचा अड्डाचालकाचा संशय

कोकण नाऊ l News Channel
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील गावडेवाडी येथील भंगार अड्डयाला आग लागून त्यातील साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.ही आग गुरुवारी (ता. २१) पहाटे लागल्याची शक्यता आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले .भंगार खरेदी व विक्री करणारे गयापाल कश्यप यांनी मात्र ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. यावेळी त्यांनी कर्नाटक येथील साथीदारावर संशय व्यक्त केला.कश्यप यांचे त्याच्यासोबत बुधवारी भांडण झाले होते. त्या रागातून ही आग त्यानेच लावली असावी असा संशय असून याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचेही त्याने सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेजवळ गयापाल कश्यप यांचा भंगार अड्डा आहे. यामध्ये
रद्दी, बाटल्या, पत्रे, कागदी पुट्ठे आदी भंगार साहित्य साठवणूक करून ठेवण्यात येते. प्रत्येक गावातून भंगार गोळा करून या गोदामात त्याचा साठा केला जातो.
दरम्यान,गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. या आगीत १८ हजार रुपये किमतीचा वजन काटा, ७० हजार रुपये किमतीची प्रेस मशीन याबरोबरच इतर साहित्य मिळून सुमारे ४ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे कश्यप याने सांगितले. याच गोडाऊनमध्ये रिकाम्या बाटल्यांचा मोठा साठा होता. तो मात्र सुदैवाने बचावल्याने आणखी नुकसान टळले.

error: Content is protected !!