सुगंधा परब यांचे निधन

कणकवली येथील सुगंधा प्रभाकर परब (७४) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी कलमठ येथे अंत्यसंस्कार
करण्यात आले. अनेक वर्षे परब कुटुंबिय शहरातील बिजलीनगर येथे राहत होते. त्यानंतर कलमठ कुंभारवाडी येथे मुलाकडे त्या स्थायीक झाल्या होत्या. त्यांच्या
पश्चात तीन मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पती कै. भाऊ परब यांचे जुन्या काळी कणकवलीत सुहास पान शॉप आणि सायकल मार्टचे प्रसिद्ध दुकान होते. अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ, धार्मिक
स्वभावामुळे त्या सुपरिचित होत्या. शहरातील सुहास पान शॉपचे सुनील व सुहास
परब यांच्या त्या मातोश्री, कोकण रेल्वेचे उपमुख्य दक्षता अधिकारी विजय शिंदे, सुकळवाड येथील व्यावसायीक संजय परब आणि येथील मिलींद मारुती पालव
यांची ती सासू होत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!