कामगिरीवर काढलेल्या प्रदीप मांजरेकर यांना कलमठ बाजारपेठ शाळेत नियुक्ती द्या!
माजी ग्रा. प. सदस्य विनायक मेस्त्री यांची मागणी
शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्यामागे त्यांची होती महत्वाची भूमिका
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे वेधले लक्ष
पूर्ण प्राथमिक कलमठ बाजारपेठ शाळेमध्ये मागील दीड वर्षापासून कार्यरत असलेले राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री प्रदीप मांजरेकर यांची शिक्षण विभागाने कामगिरीच्या नावाखाली इतरत्र नेमणूक केलेली आहे .त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेतील इतर शिक्षकांवर अध्यापनाचा अतिरिक्त ताण पडत आहे. व मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा परिणाम मागील शैक्षणिक वर्षापेक्षा यावर्षी पटसंख्येमध्ये घट होऊ शकते.
वस्तुतः कलमठ बाजारपेठ शाळेने शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला यामध्ये श्री प्रदीप मांजरेकर या शिक्षकाचा महत्वाचा सहभाग होता.
तरी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता कृपया सदरच्या शिक्षकाला कलमठ बाजारपेठ शाळेमध्ये नियमित शिक्षक म्हणून रुजू होण्याचे तातडीने आदेश व्हावेत अशी मागणी माजी ग्रा प सदस्य विनायक भालचंद्र मेस्त्री यांनी गटशिक्षणाधिकारी कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.