जय केसरकर मित्रमंडळ वर्दे तर्फे रांगणागड स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न
कणकवली/मयूर ठाकूर
शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ दिवशी जय केसरकर मित्रमंडळ वर्दे तर्फे रांगणागड स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. मित्रमंडळाचे एकूण १४ सदस्य या अभियानात सहभागी झाले होते. दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुर्गम गडांचे संरक्षण व संवर्धन करणे या उदात्त हेतूने रांगणागड स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या रात्री सर्व सदस्यांनी रांगणाई मंदिरात व शेजारील हनुमान मंदिरात मारूती स्तोत्र, हनुमान चालीसा, आरती व ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष करत परिसर भक्तीमय करून टाकला.रात्री सर्वांनी गाण्याच्या भेंड्या व पत्ते खेळत आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व ओळखून १० गावठी आंबे , १० फणस , ५ साग व ५ अननस वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी एक खारीचा वाटा उचलला. नंतर सर्वांनी धबधब्यावर आंघोळ करण्याचा आनंद लुटला.
सदर अभियानात जय केसरकर मित्रमंडळ वर्दे चे अध्यक्ष श्री. अमित आपटे, उपाध्यक्ष श्री. अभय आपटे, सचिव श्री. निखिल आपटे, सहसचिव श्री. शार्दुल दामले, खजिनदार श्री. मकरंद आपटे, सदस्या सौ. अदिती आपटे, ॲड. सौ. गौरी आपटे पटवर्धन, श्री. युवराज पटवर्धन, श्री. सौरभ आपटे, पार्थ आपटे, कु. मैत्रेयी आपटे, पुनीत आपटे, मीरा आपटे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
रांगणागड येथे रांगणाई मंदिराबाहेर शासनाने सौरदीप उभारून दुर्गप्रेमींची चांगली सोय केली आहे. पणं अजूनही अनेक सोयी करणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची खरचं निकडीची गरज आहे.