आदर्श कार्याचा सन्मान-जेराॅन फर्नांडिस

आदर्श पुरस्कार प्राप्त मंडल अधिकारी अजय परब यांचा आचरे येथे सत्कार

आचरा मंडल अधिकारी अजय परब यांनी केलेल्या आदर्श कार्याचा सन्मान शासनाने केला असून भविष्यात त्यांना पदोन्नतीने मोठी पदे मिळावीत असे मत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी व्यक्त केले. महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱे आचरा मंडल अधिकारी अजय परब यांना स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले त्याबद्दल आचरे येथे ग्रामस्थ,आणि मंडलातील कर्मचाऱ्यांकडून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत चिंदर माजी सरपंच संतोष कोदे, सुनील खरात, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर,अभय भोसले,देवस्थान ट्रस्टी कपिल गुरव ,दयाळ अपराज,विश्वास गांवकर, गुरु कांबळी,तलाठी रविराज शेजवल,देसाई, संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी, सौ अपराज,यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.यावेळी परब यांचा जेराॅन फर्नांडिस, संतोष कोदे मित्र मंडळ, देवस्थान समिती आदींतर्फे सत्कार करण्यात आला.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!