सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे 15 ऑगस्ट ला आमरण उपोषण.

कणकवली/मयूर ठाकूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी गेले अनेक महिने जात पडताळणी समिती ठाणे येथे सुणावणी होऊन देखील प्रलंबित असल्याकारणाने तसेच सेवाविषयक फाईल आणि निवडणूक फाईलवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याकारणाने होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे विद्यार्थी, पालक व संबंधित उमेदवार 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे पालन होत नसून शासनाच्या आदेशानुसार सुनावणी झाल्यानंतर आठ दिवसात जात वैधता निर्गमित करणे अपेक्षित आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाला डावरले जात असल्याची व्यथा पंचक्रोशी ठाकूर समाज कणकवलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मांडली. सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी बाबत गांभीर्य लक्षात घेऊन तसेच उपोषणाबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ जात पडताळणी समिती येथे संपर्क साधून लवकरात लवकर जात पडताळणी देण्याबाबत आदेश दिलेले आहेत. मात्र जोपर्यंत जात वैधता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थी पालक आणि संघटनेच्या वतीने अध्यक्ष अमित ठाकूर आणि सचिव समीर ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी पालक चंद्रकांत ठाकूर, प्रवीण गाडगे, पांडुरंग गाडगे, ज्योती ठाकूर, विलास ठाकूर, गिरीश बावलेकर, विजय बावलेकर, प्रताप ठाकूर, श्रवण कानडे, प्रतीक ठाकूर, संपदा ठाकूर,सुप्रिया ठाकूर, राजन ठाकूर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!