फोंडाघाट ज्वेलर्स दुकानातील दागिने चोरी प्रकरणातील आरोपी अर्पिता रावलेला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

फोंडाघाट बाजारपेठमधील गौरी अलंकार ज्वेलर्स दुकानातील दागिने चोरल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपी अर्पिता रावले हिला कणकवली न्यायालयात हजर केले असता तिची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. अक्षय चिंदरकर यांनी काम पहिले.
दाखल फिर्यादीनुसार दिनांक ३०/७/२४ रोजी आरोपीने फिर्यादी यांचे गौरी अलंकार ज्वेलर्स दुकानात जाऊन मंगळसूत्र दाखवण्याची मागणी केली त्यावेळी फिर्यादीने आरोपीस वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र बघण्यास दिली. मात्र मंगळसूत्र बघून झाल्यानंतर परत कपाटत ठेवताना एक मंगळसूत्र व पेंडेंट कमी असल्याचे जाणवू लागल्याने फिर्यादी व त्याच्या वडिलांनी cctv मधे पाहिले असता आरोपीने मंगळसूत्र पाहत असताना मंगळसूत्र व पेंडेंट फिर्यादीची नजर चुकवून चोरी करुन ती तिच्या पंजाबी ड्रेसच्या किशात घालत असताना दिसून आली म्हणून पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली.
दिनांक ४/८/२४ रोजी आरोपीस मुंबईतून अटक करण्यात आलेली होती. ३ दिवस पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीची तपासकामात ढवळाढवळ करू नये, तपासकामात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव आणू नये अशा अटी शर्थींवर १५००० रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!