चेंदवण मळावाडी येथील पूरग्रस्तांना वैभव नाईकांचा मदतीचा हात

नुकसानीची केली पाहणी; शासकीय मदतही मिळवून देणार

कर्ली नदीचे पाणी घरात घुसून झालेल्या चेंदवण-मळावाडी येथील नुकसानीची आज ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. दरम्यान संबंधित नुकसानुग्रस्तांना धीर देत वस्तूरुपात मदत केली. तसेच शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री. नाईक यांनी दिले. त्या ठिकाणी पाणी घुसल्यामुळे परिसरातील घराचे नुकसान झाले होते. काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आज श्री. नाईक यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, सरपंच वैभव चेंदवणकर नगरसेवक उदय मांजरेकर, माजी नगरसेवक सचिन काळप, शिवसेनेचे जेष्ठ बाळासाहेब धुरी, चेंदवण शिवसेना शाखाप्रमुख किरण कोचरेकर, नेरुर जिल्हा परिषद शिवसेना विभागप्रमुख शेखर गावडे, युवा सेनेचे अमित राणे, माजी शिवसेना नेरूर महिला उपविभागप्रमुख सौ. प्रणाली प्रशांत तेंडूलकर, युवा सेनेचे राजु गवंडे, कुडाळ शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर, पोलीस पाटील उमेश श्रृंगारे, ग्रामसेवक निवतकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

error: Content is protected !!