खासदार नारायण राणे यांनी केले मेस्त्री कुटुंबीयांचे सांत्वन
नीलम राणे, आमदार नितेश राणे यांची देखील उपस्थिती
भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री व युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, सौ.नीलम राणे व आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.सोबत डॉ.मिलिंद कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार नारायण राणे, नीलम राणे व आमदार नितेश राणे यांनी मेस्त्री कुटुंबीयांना धीर दिला.