हरकुळ धरणाचे पाणी नदीपात्रात सोडा!

नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत यांची मागणी
पाण्याअभावी नागवे येथील नळ योजना बंद
नदीपात्रालगतच्या अनधिकृत पाणी उपशावर कारवाई करा!
कणकवली तालुक्यातील हरकुळ नदीपात्रालगत असलेल्या नागवे गावातील नळ योजना गेले काही दिवस पाण्याअभावी बंद झाली असून, या नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडा अशी मागणी मागणी नागवे ग्रामपंचायतचे सदस्य संदेश सावंत यांनी केली आहे. नागवे गावची नळ योजना हरकुळ नदीपात्रालगतच्या गाडीसाना या ठिकाणी असलेल्या उद्भव विहिरीवरून कार्यान्वित आहे. गेले काही दिवस नदी पात्रातील पाणी सुकल्यामुळे ही नळ योजना बंद स्थितीत असून, यामुळे ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सोडण्याकरिता हरकुळ धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यास या गावासह अन्य नदीपत्रालगतच्या गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.त्यामुळे तातडीने नदीपत्रात पाणी सोडण्याची मागणी श्री सावंत यांनी केली आहे. तसेच या नदीवर काही भागांमध्ये ऊस शेतीसाठी पाणी उपसा करण्याकरिता पंप लावण्यात आले आहेत. यामुळे नदीपात्रे कोरडी पडत आहेत. त्या अनधिकृत पाणी उपसा वर कारवाई करण्याची मागणी श्री सावंत यांनी केली आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली