कणकवलीत भटक्या कुत्र्यांचा रेडकावर जीवघेणा हल्ला

कणकवलीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला
मुख्याधिकारी या प्रकरणी लक्ष देतील काय
कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सध्या वाढला असून गेली काही दिवस भटक्या कुत्र्यांनी शहरवासीय त्रस्त झाले असतानाच आज कणकवली टेंब वाडी परिसरात म्हशीच्या रेडकू वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत अक्षरशा त्याचा कोथळा बाहेर काढला. जिवंत रेडकावर केलेल्या हल्ल्यात अक्षरशा टेंबवाडी परिसरात हे रेडकू विव्हळत होते. भटक्या कुत्र्यांनी या रेडका वर केलेल्या हल्ल्यामुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील काय असा सवाल कणकवली शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या रेडकाचे कुत्र्यानी लचके तोडले असून याबाबत कणकवली नगरपंचायत कडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली