पळसंब लोखंडी प्लेट चोरी प्रकरणी तातडीने तपासाची मागणी

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली होती आचरा पोलीस सस्टेशनला तक्रार
पळसंब येथील बंधाऱ्याच्या १८प्लेट १९मार्चला चोरीस गेल्याची तक्रार आचरा पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. याबाबत अजून पर्यंत चोरीचा छडा न लागल्याने मंगळवारी सायंकाळी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि पळसंब ग्रामस्थांनी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची भेट घेऊन तातडीने तपास करण्याची मागणी केली.यावेळी उपसरपंच अवी परब, चंद्रकांत तर्फे, दत्ताराम साटम,मोहन साटम,कमलेश साटम आदी उपस्थित होते.
पळसंब खालचीवाडी येथील बंधाऱ्याचे अठरा लोखंडी प्लेट १९मार्चला अज्ञाताने चोरून नेले आहेत. याबाबत पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. अजूनही चोरीचा छडा न लागल्याने शेतीसाठी साठवले जाणारे पाण्याची अडवणूक केली जात नसल्याने येथील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. पळसंब येथे या बंधाऱ्याच्या पाण्यावर साधारण एक एकर क्षेत्र ओलीताखाली येते. या पाण्यावर भुईमुग, कुळीथ आदी उन्हाळी शेती येथील शेतकरी करत आहेत.यासाठी बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा वापर केला जात होता. मात्र अज्ञाताने प्लेट चोरून नेल्याने पाणी साठवणूक होत नाही. यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी शेती धोक्यात आली आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांची भेट घेऊन पळसंब येथील शेतकऱ्यांनी संबधीत चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली.
आचरा- अर्जुन बापर्डेकर