परभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर तर अकोल्यासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी…
मुंबई – परभणी आणि अकोला लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ‘समन्वयक’ पदाची नियुक्ती केली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश उपाध्यक्ष राजेश विटेकर तर अकोला मतदारसंघासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.
महायुती आणि घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व प्रमुख मान्यवरांशी संपर्क करुन उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा व निवडणूक जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याच्यादृष्टीने समन्वय करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिले आहेत.