शासनाच्या अन्यायकारक जीआर बद्दल शिक्षक भारती आवाज उठवणार – संतोष पाताडे

शासनाच्या अन्यायका रक जीआर विरोधात गुरुवार दि.२१/०३/२०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय गणपती कमलकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी माहिती दिली .
की, शासन वेळोवेळी शिक्षणविभाग व शिक्षकांबद्दल वेगवेगळे जीआर काढून एक प्रकारे अन्याय करत असते पण असे अन्याकरक जीआर च्या विरोधात शिक्षक भारती नेहमीच आवाज उठवत असते त्यामुळे संचमान्यतेचे सुधारित निकष व शिक्षक संवर्गासाठी पेहरावा बद्दल मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत पण शिक्षक भारतीचे आधारस्तंभ,मार्गदर्शक सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष सन्माननीय नवनाथ गेंड सर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर शासनाच्या या अन्यायकारी धोरणाविरोधात शिक्षक भारती शासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून शैक्षणिक कामकाज पाहत आहेत.
संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी यांचे नुकसान होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कलानुसार कला,क्रीडा,संगीत शिकण्याचा अधिकार आहे.तसेच प्रत्येक विषयाला शिक्षक असणे तितकेच गरजेचे आहे.
शिक्षकांच्या पेहरावाबद्दल शिक्षक नेहमीच काळजीवाहू असतात कारण शिक्षक हा समाजाचा आरसा असतो,त्यामुळे शिक्षकांच्या पेहरावाबद्दल मार्गदर्शक सूचना निर्गमित करून शिक्षकांवर एक प्रकारे अन्यायच केला आहे.
अशाप्रकारे विविध मागण्यांचे निवेदन आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय गणपती कमलकर यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे सरचिटणीस अरुण पवार कोषाध्यक्ष रवींद्र देसाई, उपाध्यक्ष जनार्दन पाटील ,मालवण तालुका अध्यक्ष दिनकर शिरवलकर, सचिव कृष्णा कळकुंद्रिकर,कुडाळ तालुका अध्यक्ष विनेश जाधव,जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे, राकेश कर्पे,किरण चेंडगे, उमेश खराबी, नागेश जाधव, प्रमोद कुडासकर, यशवंत गवस आदी शिक्षक भारती शिलेदार उपस्थित होते.





