काळसे हुबळीचा माळ येथे दुचाकीचा अपघात

चौके आज गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी होबळीचामाळ येथे नेरुरपार पुलानजिक मालवण येथून कुडाळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वार गोविंद पांडुरंग सारंग राहणार देवबाग यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर पडले आणि त्यांचा अपघात झाला यामध्ये गोविंद सारंग यांच्या डोक्याला मागील बाजूस मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेच्या साहाय्याने दाखल करण्यात आले. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित पोलीस हेड कॉन्सबल महेंद्र देउलकर यांनी दिली. दरम्यान जिल्हा वाहतूक शाखा ओरोसचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र देउलकर यांच्यासोबत महिला हेड कॉन्स्टेबल संप्रसा सावंत, पोलीस नाईक अविनाश गायतोंडे यांनी दुर्घटनेनंतर अपघातस्थळी भेट देउन पाहणी केली.

error: Content is protected !!