कणकवलीत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत आयोजन
कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी शुक्रवार २२ मार्च आणि शनिवार २३ मार्च रोजी न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प. पू. भालचंद्र महाराज मठ नजीक येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२४ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यास मा. समीर नलावडे यांच्याकडून २५००० रुपये आणि उपविजेत्या संघास कणकवली बॅडमिंटन क्लब यांच्याकडून १५००० रुपये देण्यात येणार आहे. तसेच वयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व क्रीडारसिकानी या स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली बॅडमिंटन क्लब यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी