राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस पदाच्या देवगिरीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने नियुक्त्या…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश आणि जिल्हा नियुक्त्या करण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने प्रदेश उपाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे, दत्तात्रय चव्हाण, हरिहरराव भोसीकर यांची तर प्रदेश सरचिटणीस पदी सुभाष गायकवाड, राजेंद्र गुंड, वामनराव उर्फ भाऊसाहेब गोरठेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब उर्फ प्रविणकुमार नहाटा, अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष पदी संजय कोळगे, युवक काँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्षपदी सागर भोसले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या सर्वांचे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य लाभेल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते आणि सरचिटणीस अविनाश आदिक, आमदार प्रकाश सोळंके, कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.