लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट मध्ये चेक पोस्टवर 10 लाखाची रोकड जप्त

स्थिर सर्वेक्षण पथकाची धडक कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली तालुक्यात फोंडाघाट चेक पोस्ट येथे महसूल व पोलीस पथकामार्फत वाहनांची सकाळी 11 वा. तपासणी सुरू असताना स्थिर सर्वेक्षण पथक (SST) ला GA 03 Z 6362 या वाहनामध्ये दहा लाख रोख रक्कम मिळून आली. या वाहनातील व्यक्ती या गोव्याच्या दिशेने जात होते. या वाहनातील रक्कम आर्किटेक असलेल्या व्यक्तीने गोवा येथे आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी नेत असल्याची प्राथमिक माहिती दिली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.सदर ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी कणकवली तसेच पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी भेट दिली असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योग्य ती कार्यवाही चालू आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान आयकर विभागाकडून या रकमेची तपासणी करून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती तडवी यांनी दिली.
दिगंबर वालावलकर कणकवली